• Home
  • About Us
  • Services
    • For Students 9-12 Grades
    • For Professionals
    • For Women: Restart your Journey
  • Assessments
  • Books And Publications
  • Blogs
  • Resources
    • Our Team
    • FAQ
    • Testimonials
    • Gallery
    • Video
    • Events
  • Contact
    • Home
    • About Us
    • Services
      • For Students 9-12 Grades
      • For Professionals
      • For Women: Restart your Journey
    • Assessments
    • Books And Publications
    • Blogs
    • Resources
      • Our Team
      • FAQ
      • Testimonials
      • Gallery
      • Video
      • Events
    • Contact
  • optima.coachsaira@gmail.com
coachsaira

coachsaira

  • Home
  • About Us
  • Services
    • For Students 9-12 Grades
    • For Professionals
    • For Women: Restart your Journey
  • Assessments
  • Books And Publications
  • Blogs
  • Resources
    • Our Team
    • FAQ
    • Testimonials
    • Gallery
    • Video
    • Events
  • Contact

१० वी आणि १२ वी नंतरच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसायिक कोर्सेससाठी मार्गदर्शक

  • April 12, 2025
  • admin
  • 0

हा लेख विद्यार्थ्यांना आणि पालकांना महाराष्ट्रातील व्यवसायिक शिक्षणासाठीच्या मर्यादा, संधी, उपलब्ध कोर्सेस आणि सहाय्य प्रणाली समजून घेण्यासाठी एक संपूर्ण मार्गदर्शक प्रदान करते.

परिचय

खूप विद्यार्थ्यांना करिअर निवडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रत्येक कुटुंब महागड्या महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही आणि काही विद्यार्थ्यांना पारंपरिक शैक्षणिक विषयांत यश मिळवणे कठीण जाते. व्यवसायिक कोर्सेस लवकर, कमी खर्चात प्रत्यक्ष कौशल्ये शिकवतात आणि लवकर कमाई सुरू करण्याची संधी देतात.

काही विद्यार्थ्यांवर कुटुंबाच्या जबाबदाऱ्या देखील असतात आणि त्यांना लवकरच कामाला लागावे लागते. व्यवसायिक प्रशिक्षणाने प्रत्यक्ष कौशल्ये शिकवली जातात ज्यामुळे विद्यार्थी तत्काळ नोकरीसाठी तयार होतात. पारंपरिक महाविद्यालयीन कार्यक्रमांत पुरेशी जागा नसल्यास व्यवसायिक कोर्सेस एक उत्तम पर्याय म्हणून समोर येतात.

व्यवसायिक शिक्षण हा विशिष्ट कामांसाठी लागणारी कौशल्ये शिकण्याची संधी आहे. हे कोर्सेस तांत्रिक काम, वाणिज्य, हॉटेलव्यवस्था, फॅशन, ब्युटी आणि आरोग्य सेवा यांसारख्या क्षेत्रांना व्यापतात. शासनाकडून मिळणाऱ्या सहाय्य आणि खास योजनेमुळे व्यवसायिक कोर्सेसमुळे विद्यार्थी नोकरी मिळवू शकतात किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात.


व्यवसायिक कोर्सेस का निवडावेत?

मर्यादा (अडचणी)

  1. आर्थिक मर्यादा:
    अनेक कुटुंबांना महागड्या महाविद्यालयीन शिक्षणाचा खर्च भरता येत नाही. व्यवसायिक कोर्सेस कमी खर्चात असून विद्यार्थ्यांना लवकर कमाई सुरू करण्यास मदत करतात.
  2. शैक्षणिक अडचणी:
    काही विद्यार्थ्यांना पारंपरिक विषय आणि सैद्धांतिक शिक्षण कठीण जाते. व्यवसायिक प्रशिक्षण प्रत्यक्ष कौशल्यांवर लक्ष केंद्रित करते, ज्यामुळे शिकणे सोपे होते.
  3. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या:
    काही विद्यार्थ्यांना लवकर काम करणे आवश्यक असते ज्यामुळे त्यांचे कुटुंब समर्थीत राहू शकते. व्यवसायिक कोर्सेस त्यांना लवकर नोकरीसाठी तयार करतात.
  4. महाविद्यालयीन जागा आणि उच्च कट-ऑफ्स:
    नियमित महाविद्यालयीन कार्यक्रमांसाठी खूप स्पर्धा असते. व्यवसायिक कोर्सेस यशाचा दुसरा मार्ग म्हणून उपयुक्त ठरतात.

संधी (फायदे)

  1. नोकरीसाठी तयार कौशल्ये:
    व्यवसायिक कोर्सेस प्रत्यक्ष, जीवनातील कौशल्ये शिकवतात जी अनेक नोकऱ्यांसाठी आवश्यक असतात. हे प्रत्यक्ष प्रशिक्षणावर भर देतात ज्यामुळे विद्यार्थी लगेचच काम सुरू करू शकतात.
  2. लहान कालावधी आणि कमी खर्चिक:
    बहुतेक व्यवसायिक कार्यक्रम पारंपरिक डिग्रींपेक्षा कमी वेळ घेतात आणि स्वस्त असतात. यामुळे उपयोगी कौशल्ये शिकताना वेळ आणि पैसे दोन्ही वाचतात.
  3. जास्त नोकरीच्या संधी:
    उद्योगांना विशिष्ट कौशल्ये जाणणारे कामगार हवे असतात. व्यवसायिक कोर्सेस विद्यार्थ्यांना त्या नोकऱ्यांसाठी तयार करतात, ज्यामुळे त्यांना स्थिर नोकरी मिळण्याची शक्यता वाढते.
  4. उद्योजकतेचा मार्ग:
    बेकिंग, शिवणकाम किंवा ब्युटी सर्व्हिसेससारखे कोर्सेस विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत करतात. अशाप्रकारे विद्यार्थी नोकरीची प्रतीक्षा न करता स्वतंत्रपणे कमाई करू शकतात.

महाराष्ट्रातील १० वी आणि १२ नंतर उपलब्ध व्यवसायिक कोर्सेस

खाली 20 व्यवसायिक कोर्सेस दिलेले आहेत जे शासकीय ITI, पॉलिटेक्निक आणि खाजगी संस्था यांच्यामार्फत उपलब्ध आहेत:

🔧 तांत्रिक आणि अभियांत्रिकी क्षेत्र

  1. इलेक्ट्रीशियन: विद्युत प्रणाली बसवणे, देखरेख आणि दुरुस्ती शिकणे.
  2. फिटर: यांत्रिक भागांची जोडणी आणि फिटिंग शिकणे.
  3. वेल्डर: उद्योगांमध्ये वापरल्या जाणार्‍या धातूंच्या जोडणी तंत्राचा अभ्यास.
  4. रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग तंत्रज्ञ: थंड करणाऱ्या प्रणाली बसवणे आणि दुरुस्ती शिकणे.
  5. ऑटोमोबाईल मकेनिक: कारच्या इंजिन, भाग आणि डायग्नोस्टिक्सवर काम करणे.
  6. कंप्युटर हार्डवेअर आणि नेटवर्किंग: कंप्युटरची असेंब्ली आणि नेटवर्क सेटअप शिकणे.
  7. सिव्हिल ड्राफ्ट्समन: ड्रॉइंग टूल्स किंवा सॉफ्टवेअर वापरून इमारतींची योजना तयार करणे.

💼 वाणिज्य आणि कार्यालयीन काम

  1. स्टेनोग्राफी (इंग्रजी/मराठी): ऑफिस कामासाठी शॉर्टहँड आणि टायपिंग शिकणे.
  2. ऑफिस असिस्टंट / सचिवीय प्रॅक्टिस: फाईलिंग आणि दस्तऐवजीकरणासारख्या कार्यालयीन कामांचे व्यवस्थापन.
  3. कंप्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA): मूलभूत कंप्युटर अनुप्रयोग आणि प्रोग्रामिंग शिकणे.

🧑‍🍳 हॉटेलव्यवस्था आणि अन्नक्षेत्र

  1. फूड प्रॉडक्शन (कुकिंग): हॉटेल किंवा रेस्टॉरंटसाठी व्यावसायिक स्वयंपाक शिकणे.
  2. बेकररी आणि कन्फेक्शनरी: ब्रेड, केक, आणि मिठाईंचे बेकिंग शिकणे.
  3. हाऊसकीपिंग: स्वच्छता, आरोग्यदायीपणा आणि हॉटेल सेवा शिकणे.
  4. फ्रंट ऑफिस असिस्टंट: स्वागत आणि ग्राहक सेवा कौशल्ये शिकणे.

🧵 फॅशन आणि डिझाइन

  1. फॅशन डिझाइन आणि गारमेंट टेक्नॉलॉजी: शिवणकाम, पॅटर्न मेकिंग आणि फॅशन डिझाइन शिकणे.
  2. एम्ब्रॉइडरी आणि नीडलवर्क: हाताने काम, कापड कलाकृती आणि सर्जनशील डिझाइन शिकणे.

💇 ब्युटी आणि वेलनेस

  1. हेअर आणि स्किन केअर: ब्युटीशियन किंवा स्किनकेअर स्पेशलिस्ट बनण्यासाठी प्रशिक्षण.
  2. हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर: सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता आणि तपासणी तंत्र शिकणे.

🏥 आरोग्य सेवा आणि संबंधित क्षेत्र

  1. DMLT (मेडिकल लॅब तंत्रज्ञानाचा डिप्लोमा): लॅब सॅम्पल्स वापरून चाचण्या व निदान शिकणे (12वी विज्ञान आवश्यक).
  2. नर्सिंग केअर असिस्टंट: रुग्णांची काळजी घेणे आणि आरोग्यसेवा कर्मचार्‍यांना सहाय्य करणे.

राष्ट्रीय स्तरावरील व्यवसायिक कोर्सेससाठी शासकीय वेबसाइट्स

खालील वेबसाइट्स कोर्सेस, प्रशिक्षण केंद्रे आणि शासकीय योजनांबद्दल माहिती पुरवतात:

  1. www.skillindia.gov.in: Skill India मिशनसाठी मुख्य पोर्टल.
  2. www.nsdcindia.org: National Skill Development Corporation – प्रशिक्षण व निधीबद्दल माहिती.
  3. www.dgt.gov.in: ITI आणि प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती, Directorate General of Training कडून.
  4. www.ncvtmis.gov.in: ITI एनरोलमेंट, प्रमाणपत्र आणि ट्रॅकिंगसाठी पोर्टल.
  5. www.msde.gov.in: Skill Development & Entrepreneurship मंत्रालयाच्या योजना व अद्ययावत माहिती.
  6. www.pmkvyofficial.org: Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana (PMKVY) विषयी तपशील.
  7. www.nios.ac.in: NIOS कडून दूरस्थ शिक्षणामार्फत व्यवसायिक कोर्सेस.
  8. www.rural.nic.in: ग्रामीण विकास योजनांची माहिती जसे की DDU-GKY.
  9. www.kaushalkar.com: प्रशिक्षण केंद्रे, कोर्सेस आणि नोकरी शोधण्यासाठी पोर्टल.
  10. www.ediindia.org: उद्योजक विकास संस्था (EDI) – प्रशिक्षणासाठी सहाय्य.

महाराष्ट्रातील व्यवसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकासासाठी शीर्ष योजना

महाराष्ट्र शासनाकडून व्यवसायिक प्रशिक्षणासाठी खालील शीर्ष योजना उपलब्ध आहेत:

  1. कुशल महाराष्ट्र योजना:
    ही राज्यस्तरीय प्रमुख योजना आहे जी शॉर्ट-टर्म कौशल्य प्रशिक्षण देते, विशेषतः अर्ध-शहरी व ग्रामीण युवकांसाठी.
  2. महाराष्ट्र राज्य नवोन्मेष आणि स्टार्ट-अप धोरण:
    ही योजना युवकांना आणि उद्योजकांना इन्क्युबेशन, मार्गदर्शन आणि स्टार्टअप सिड फंडिंग प्रदान करते.
  3. प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना:
    18 ते 35 वर्षे वयोगटातील युवकांसाठी प्रगत व्यवसायिक प्रशिक्षण देते, ज्यात सॉफ्ट स्किल्स, डोमेन प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सहाय्य यांचा समावेश आहे.
  4. महाSwayam रोजगार पोर्टल:
    नोकरी शोधणाऱ्या, नियोक्ते आणि प्रशिक्षण पुरवठादार यांना एकत्र आणणारा एक केंद्रीकृत ऑनलाइन प्लॅटफॉर्म.
  5. DDU-GKY महाराष्ट्र:
    गरीब परिवारातील ग्रामीण युवकांसाठी, Deen Dayal Upadhyaya Grameen Kaushalya Yojana अंतर्गत अंमलात आणली जाणारी योजना.
  6. MS-CIT:
    महाराष्ट्र राज्य प्रमाणपत्र (MS-CIT) हा MKCL कडून चालणारा लोकप्रिय कंप्युटर साक्षरता कार्यक्रम आहे.
  7. PMKVY केंद्र महाराष्ट्र:
    Pradhan Mantri Kaushal Vikas Yojana अंतर्गत केंद्रिय निधीने व राज्यपातळीवर चालणारे व्यवसायिक प्रशिक्षण केंद्र.
  8. ITI प्रवेश सहाय्य व शिष्यवृत्ती:
    ITI मध्ये SC/ST/OBC/EWS विद्यार्थ्यांसाठी आर्थिक आणि प्रवेश सहाय्य उपलब्ध करून दिले जाते.
  9. राष्ट्रीय Apprenticeship Promotion Scheme (NAPS):
    विविध उद्योगांमध्ये Apprenticeship प्रशिक्षण देणारी आणि सरकारच्या स्टायपेंड शेअरिंगसह चालणारी योजना.
  10. महाराष्ट्र कृषी व अन्न प्रक्रिया कौशल्य विकास:
    अन्न तंत्रज्ञान, कोल्ड स्टोरेज आणि अन्न प्रक्रियेच्या क्षेत्रातील कारकीर्दीसाठी क्षेत्रविशिष्ट प्रशिक्षण देते.

महाराष्ट्र राज्य शासनाचा व्यवसायिक प्रशिक्षणासाठी सहाय्य

खाली महाराष्ट्र राज्य शासन विद्यार्थ्यांना, विशेषतः शाळा सोडलेल्या, ग्रामीण युवकांसाठी आणि 10th/12th नंतर कौशल्य शोधणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसायिक प्रशिक्षण कसे पुरवते याचे एक उपयुक्त अवलोकन आहे:

🌐 महाराष्ट्र – व्यवसायिक प्रशिक्षण व कौशल्य विकासासाठी 10 महत्त्वाच्या वेबसाइट्स:

  1. www.mahaskills.gov.in:
    महाराष्ट्र स्टेट स्किल डेवलपमेंट सोसायटी (MSSDS) – राज्यस्तरीय सर्व कौशल्य कार्यक्रमांसाठी नोडल एजन्सी.
  2. www.dvet.gov.in:
    Directorate of Vocational Education & Training – ITI, प्रवेश, ट्रेड्स, परीक्षा आणि प्लेसमेंट विषयी माहिती.
  3. www.skilluniversity.msbte.org.in:
    MSBTE स्किल युनिव्हर्सिटी – महाराष्ट्रभरातील कौशल्याधारित डिप्लोमा व प्रमाणपत्र कार्यक्रम.
  4. www.maharojgar.gov.in:
    राज्य रोजगार पोर्टल – प्रशिक्षण, नोकरी, करिअर फेअर्स आणि Apprenticeship संधी शोधण्यासाठी.
  5. www.msbte.org.in:
    महाराष्ट्र राज्य बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन – डिप्लोमा, पॉलिटेक्निक आणि व्यवसायिक कार्यक्रमांसाठी मान्यता पुरवणारी संस्था.
  6. www.rojgar.mahaswayam.gov.in:
    महाSwayam पोर्टल – कौशल्य विकास, नोकरी आणि उद्योजकतेसाठी एक एकत्रित प्लॅटफॉर्म.
  7. www.apprenticeshipindia.gov.in:
    राष्ट्रीय Apprenticeship पोर्टल – महाराष्ट्रातील Apprenticeship संधी शोधण्यासाठी.
  8. https://livelihoods.mahaonline.gov.in:
    महाराष्ट्र Rural Livelihoods Mission – ग्रामीण भागात स्व-रोजगार व कौशल्य विकासाला प्रोत्साहन देते.
  9. www.umsd.maharashtra.gov.in:
    Urban Maharashtra Skill Development – शहरी युवकांसाठी रोजगार व प्रशिक्षण कार्यक्रम उपलब्ध करुन देते.
  10. www.nulmm.maharashtra.gov.in:
    महाराष्ट्र NULM (National Urban Livelihood Mission) – शहरी कौशल्य प्रशिक्षण व उद्योजकतेसाठी सहाय्य पुरवते.

निष्कर्ष

व्यवसायिक कोर्सेस नवीन कौशल्ये शिकण्यासाठी, लवकर काम सुरू करण्यासाठी आणि कमी खर्चात उत्तम प्रशिक्षण घेण्यासाठी उत्तम पर्याय आहेत. हे कोर्सेस आर्थिक किंवा शैक्षणिक अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच ज्यांना लवकर काम करायचे आहे त्यांच्या कुटुंबाच्या सहाय्याने उत्तम पर्याय ठरतात.

शासकीय योजना, समर्पित सहाय्य वेबसाइट्स आणि प्रत्यक्ष प्रशिक्षणाने परिपूर्ण व्यवसायिक कोर्सेसमुळे विद्यार्थ्यांना पारंपरिक महाविद्यालयीन शिक्षणाचा एक मजबूत आणि स्पष्ट पर्याय मिळतो. पालक आणि विद्यार्थी दोघांनीही आजच्या स्पर्धात्मक जगात व्यवसायिक शिक्षणाला एक मूल्यवान मार्ग म्हणून विचारात घेणे आवश्यक आहे.

… करियर कोच सायरा काळे

… मराठी भाषांतर: श्री. उमेश खेले

Tags: Build ResilienceCareer CoachingCareer GrowthCareerGuidanceCoach Saira KaleContinuous LearningEmployabilityGrowth MindsetLearning AgilityLoyalityMentorshipRecognitionRewardsSelf Awarenesstalent developmentVocational Courses
  • Previous Entrepreneurship as a Career
  • Next Loyalty and Career Growth: Striking the Right Balance

Categories

  • College
  • Education
  • High School
  • Mentorship
  • School
  • University

Recent Posts

  • Raising Office-Ready Teens
  • The Pressure to Know
  • Bridging the Generation Gap in Career Talks
  • The Role of EQ in Making Career Choices
  • Liberal Arts Education in the Age of AI

Recent Comments

No comments to show.

Subscribe Us to join Our Community

Newsletter

Social Links

Contact Info

  • +91 99401 35985
  • optima.coachsaira@gmail.com

Quick Links

  • Home
  • About Us
  • Blogs
  • Contact Us
  • Testimonials
  • Video

Our Services

  • For Students 9-12 Grades
  • For Professionals
  • For Women: Restart your Journey

2020 All Rights Reserved

  • Announcements
  • Contact Us